Become a volunteer if you are motivated & ready to support people and the community.
The simplest and quickest way to make a donation, so you can support people in need.
Start donating for our campaigns to support poor people and children returning to school.
Today, we supported the education of 20000 children born in poor families cross 12 undeveloped countries over the world . in the future, our goals are
How to make a donation on your site ?
It is not hard to make a donation right on the site. You only need to choose one of our campaigns that you love, then fill some important information in a form.
Becoming a volunteer is very difficult ?
It is simple to become a volunteer. You look for selected volunteer opportunities on our sites, fill all necessary information in the form and wait until we contact with you.
How can i raise fund for poor people ?
We have many campaigns to support people living in the poverty. If you love to raise fund for them, contact with us to know more details about campaigns dedicated to the poor.
“
असे म्हटले जाते की ज्यांचे मन शुद्ध असते त्यांच्या चेहऱ्यावर तेज आपसूक झळकते, जे नेहा भगतच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना जाणवते. अत्यंत लहान वयात नेहा भगत हिने सामाजिक, सांस्कृतिक, कलाक्षेत्रामध्ये काही करून दाखवण्याची जिद्द बाळगली आहे. तिला अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे, आत्मविश्वास मिळवून द्यायचा आहे आणि मुख्य म्हणजे सर्वांना प्रगतीपथावर घेऊन जायचे आहे. आजच्या काळात जग प्रचंड स्वार्थी होत चाललेले आहे. 'मी आणि माझे' या संकुचित विचाराने ते जगत आहेत या पार्श्वभूमीवर नेहा आणि नेहासारखी माणसे जोपर्यंत या जगात आहेत तोपर्यंत हे जग, श्रीकृष्णाने जसा गोवर्धन पर्वत तोलून धरला होता त्याप्रमाणे उच्चस्थानीच राहणार आहे. कोणत्याही चांगल्या कार्याला सढळ हाताने मदत करणारे हात आजही अस्तित्वात आहेत त्याचा प्रत्यय नेहाला नेहमीच आलेला आहे. तिच्या या अवतीभवतीच्या कष्टकरी- दुःखी- हरलेल्या- थकलेल्या जीवांमध्ये, आनंदनिर्मिती, ऊर्जानिर्मिती करणाऱ्या जीवनप्रवासाला माझा अंतःकरणपूर्वक सलाम!
प्रतिभा सराफ
कवयित्री
“
प्रिय नेहा... आजचा कार्यक्रम आणि तुझी संकल्पना फारच सुंदर होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी तू काही करतेस आणि भविष्यात करू पाहतेस, त्याकरिता तुझं कौतुक करावे तितके कमीच आहे. आजचा व्यक्त व्हा... हा कार्यक्रम मनाला खूप सुखावणारा होता. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, त्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि मला आमंत्रित केल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. ज्येष्ठ नागरिकांच्या मनाला समाधान देणारे आणि त्यांना उर्जा देणारे उपक्रम तू भविष्यात उत्तम प्रकारे राबवशील यात काही शंका नाही. तुझ्यात खूप छान सकारात्मकता आहे, जी मला पहिल्या पासून जाणवतेय. मला तुझा संस्थेसाठी काम करायला नक्कीच आवडेल.
अमित शिंदे
अभियंता (Engineer)
“
प्रिय, नेहास, "व्यक्त व्हा "चॅरिटेबल संस्थेची संस्थापिका,अध्यक्षा ,मैत्रीण आणि मुख्य म्हणजे एक संवेदनशील स्त्री ही तुझी खरी ओळख, एक मैत्रीण म्हणून तू उत्तम आहेेसच पण माणूस म्हणून अधिक उत्तम आहेेस हे जास्त भावत मला, ५वर्ष आपण ऐकमेकींना ओळखतो पण काल तू जो वेगवेगळया क्षेत्रातील स्त्रियांना एकत्र करून सगळयांचे कौतुकांचा व आमचे काव्यसंमेलन आयोजित करून एक आगळावेगळा जागर केलास ,या सगळयांच्या निमित्ताने आपण ऐकमेकींना अधिक कळलो असं मला मनापासून वाटते. इतर सर्व मानकरी भगिनींन बरोबर तू आम्हां कवयित्रीच्या साहित्यिक कार्याचा आढवा घेऊन सन्मानित केलेस यासाठी तुझे मनापासून आभार .",तू दाखवून दिलस एक बाई दुसरी साठी उभी राहू शकते,उभ करू शकते आणि कौतक करून सन्मानही करू शकते "तू केलेल्या सन्मानाचा सन्मान म्हणून मी अखेरच्या श्वासा पर्यंत कधीही लेखणी खाली ठेवणार नाही हाच माझा सर्व स्त्री शक्ती साठीचा जागर असेल आणि पूजा असेल.
उमा रावते
कवयित्री
“
आजच्या वेगवान स्पर्धेच्या युगात प्रगतीच्या नव्या वाटा उजळल्या असल्या तरीही अनेक "मळालेल्या जुन्या वाटा" काळाच्या धबडग्यात आपल्यापासून दूर दूर जाताना दिसतात.नं सांगता सवरता होणाऱ्या प्रत्यक्ष थेट भेटीगाठी, गप्पा गोष्टी, नातेवाईक, मित्र मंडळी यांचा सहवास, फोन, ग्रीटिंग कार्ड्स, घरगुती समारंभ, जवळच्या माणसाच्या हातच आवडीचं चावीष्ट भोजन, मायेचा ओलावा, भाव भावनांची लेन देन, आपुलकीचा स्पर्श...सर्वात महत्वाचं म्हणजे समाज माध्यमाच्या अतिक्रमणा मुळे माणसामाणसामधला संवाद तुटत चालला आहे... ई-मेल, मेसेज, इस्टाच्या प्रभावामुळे बोलणं,व्यक्त होणं दुरावलं आहे. माणसाचं मन महासागरा सारखं अथांग असल्यामुळे व आजच्या सामाजिक परिस्थितीमुळे व्यक्त होऊन संवाद साधण कमी होऊ लागलं आहे. म्हणूनच जेव्हा नेहा भगत सारखी आजच्या जमानात्यातली असूनही मानवी भावना, संवेदना, माणुसकी जपण्यासाठी,एकमेकांशी संवाद,बोलणं, विचारांचे आदान प्रदान यासाठी जेव्हा गांभीर्याने व्यक्त व्हा सारखं नवं, मोकळ व्यासपीठ उपलब्ध करून माणसं जोडणारा साकव होऊ पहाते तेव्हा निश्चितच आनंद, अभिमान, कौतुक वाटतं. म्हणूनच नेहा सोबत व्यक्त व्हा सोबत सक्रिय खारीचा वाटा उचलावासा वाटला. व्यक्त व्हा... मनमोकळ करा... आनंदी रहा... आनंद द्या.
अजितेम जोशी
लेखक
“
व्यक्त व्हा चारिटेबल ट्रस्ट" दादर मुंबई संस्था सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी अग्रगण्य सेवाभावी सामाजिक संस्था आहे. संगीत, साहित्य, कवी संमेलन, जागर स्त्री शक्तीचा महिलांसाठी सक्षमीकरण इत्यादी कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारे होते. "मोबाईल एक व्यसन" Social Media Injurious to Health कार्यक्रम समाज प्रबोधन जनजागृती करणारा होता. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, नशाबंदी, कार्यक्रमातून नागरिकांना समाजात व्यक्त होण्यासाठी आवाहन तसेच अन्यायाविरुद्ध संघर्ष करून सामाजिक न्याय मिळवून देणे तसेच मराठी संस्कृती अस्मिता परंपरा जपणारी संस्था समाजसेविका अध्यक्ष सौ नेहा वैभव भगत सामाजिक बांधिलकीतून समाजऋण व्यक्त करण्यासाठी समाजकार्य करीत आहे.
शशिकांत सावंत
पत्रकार, समाजसेवक, कवी | उपसंपादक- दैनिक 'देश मोर्चा'


